Top News पुणे महाराष्ट्र

बारामतीत भिलवाडा पॅटर्न मग जामखेडला का नाही?; राम शिंदे यांचा सवाल

अहमदनगर |  बारामतीत एक-दोन कोरोनाचे रूग्ण आढळून आले तर तिथे लगेच भिलवाडा पॅटर्न राबवला गेला. जामखेडमध्येही कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. मग इथे भिलवाडा पॅटर्न का नाही?, असा सवाल करत लवकरात लवकर जामखेडमध्येही भिलवाडा पॅटर्न राबवावा, अशी मागणी माजी मंत्री आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांनी केली आहे.

जामखेडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता ही संख्या 11 वर जाऊन पोहचली आहे. अशातच राम शिंदे यांनी एक पत्रक काढलं आहे. या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी जामखेडला भिलवाडा पॅटर्न राबवावा, अशी मागणी केली आहे.

राम शिंदे यांनी त्यांच्या पत्रकामध्ये थेट टीका करणं जरी टाळलं असलं तरी त्यांचा रोख हा पवार कुटुंबियांकडे असल्याचं स्पष्ट होत आहे. बारामतीमध्ये जसं जातीने लक्ष घालून कोरोनाबाबतच्या उपाययोजना केल्या गेल्या तशाच उपाययोजना जामखेडमध्येही करा, असं त्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून सुचवलं आहे.

दरम्यान, जामखेड, नगर शहर, संगमनेर, नेवासा या ठिकाणी अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केली आहेत. तसंच जामखेडमध्ये बुधवारी आणखी 2 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाला घाबरवण्यासाठी टिकटॉकवर बनवलं गाणं, आतापर्यंत ५ कोटी लोकांनी पाहिलं!

गुजरातमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा नंबर

राज्यातला कोरोनाबाधितांचा वेग मंदावला, घाबरू नका- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या