बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या सभेआधी भीम आर्मी आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई | मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र दिनी होणाऱ्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी दिली. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेच्या ग्रीन सिग्नल दिला असला तरी भीम आर्मीकडून (Bheem Army) ही सभा उधळून लावण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे.

राज ठाकरेंना सभा घेण्यासाठी पोलिसांनी 16 अटी घातल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर पोलिसांच्या या अटींचं पालन केलं नाही तर आम्ही सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. तर या अटींचे उल्लंघन केले नाही तर भीम आर्मीकडून सभेच्या ठिकाणा महापुरूषाच्या नावाच्या घोषणा दिल्या जातील, असं भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे म्हणाले आहेत.

दरम्यान, गुडीपाडवा मेळावा व उत्तर सभा गाजवल्यानंतर आता राज ठाकरे 1 मे रोजी काय बोलणार? कोणावर निशाणा साधणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर

मोठी बातमी ! राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती आली समोर

‘कोणीही मशिदींवरील भोंगे काढायला आलं तर…’, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा की मुख्यमंत्रीजी”

“कोणी योगी, कोणी भोगी तर कोणी मानसिक रोगी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More