भीमा कोरेगावच्या दगडफेकीत पोलिसाच्या भावाचा मृत्यू

पुणे | भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या घटनेत दगड लागल्याने पोलिसाच्या भावाचा मृत्यू झालाय. राहुल फटांगडे असं या तरुणाचं नाव आहे. 

भीमा कोरेगावामध्ये वातावरण तणावपूर्ण झाल्याने या प्रकरणाचे पडसाद आसपासच्या गावांमध्येही उमटले. सणसवाडीमध्ये काही वाहनं पेटवण्यात आली तसेच दगडफेक करण्यात आली. यामध्ये तोंडाला दगड लागून राहुलचा मृत्यू झाला. 

राहुलचा भाऊ विष्णू फटांगडे पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी राहुलच्या कुटुंबियांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, त्यानंतर कान्हुर मेसाई या गावी राहुलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.