भीमा कोरेगावमध्ये घडलेला प्रकार पूर्वनियोजित होता?

कोरेगाव भीमा

मुंबई | भीमा कोरेगावमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यवसान हिंसाचारात झालं. रस्त्यावरील गाड्या जाळण्यात आल्या तसेच नागरिकांनाही मारहाण करण्यात आली. मात्र ही घटना पूर्वनियोजित होती का? असा सवाल आता विचारला जातोय.

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारीला शौर्य दिनाच्या निमित्ताने दलित समाज मोठ्या प्रमाणावर जमा होत असतो. यावर्षी या घटनेला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याठिकाणी मोठी गर्दी होणार हे अपेक्षित होतं. यापार्श्वभूमीवर काही हिंदुत्ववादी शक्तींनी या वादाला चिथावणी दिल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात भाष्य केलंय. परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही हिदुंत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन-चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगत आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलंय.