भीमा कोरेगावमध्ये 2 गटांमध्ये वाद, परिस्थिती नियंत्रणात

पुणे | शिरुर तालुक्यातील भिमा कोरेगाव गावात दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

दोन गटातील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं. ज्यामुळे पुणे-नगर रोडवरील गाड्या पेटवण्यात आल्याचा तसेच काही गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

दरम्यान, राज्य राखीव दलाच्या तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

दगडफेकीच्या निषेधार्थ समता सैनिक दलानं दुपारी मोर्चा काढला…