Top News

भीमा-कोरेगाव दंगलीमागे फडणवीस सरकारचा हात; शरद पवारांचा गंभीर आरोप

Loading...

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप सरकारने दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल केली. पोलिसांकडून दंगलीच्या आदल्या दिवशी पुण्याच्या शनिवारवाडा परिसरात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्य कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

तत्कालीन सरकारला पुरोगामी आणि लोकशाही आवाज दडपून टाकायचा होता. यानंतर पोलिसांनी या दंगलीसाठी माओवादी संघटना जबाबदार असल्याचं सांगत अटकसत्र सुरु केलं  असल्याचंही पवारांनी पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, आमच्याकडे कोरेगाव भीमाची अनेक निवेदने आली आहेत. या सगळ्याची योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एका माध्यमाच्या मुलाखतीत बोलताना सागितलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेेब ठाकरे आहे”

मी मुख्यमंत्री होईन, असं वचन शिवसेनाप्रमुखांना कधीच दिलं नव्हतं- उद्धव ठाकरे

धर्माला हात लावला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन- राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या- 

भीमा-कोरेगाव दंगलीमागे फडणवीस सरकारचा हात; शरद पवारांचा गंभीर आरोप

“तुमचा फोन टॅप होतोय, भाजपच्या माजी मंत्र्यांनीच मला माहिती दिली”

शरद पवारांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने हटवली

आमच्यासोबत यायचं असेल तर ही अट मान्य करावी लागेल- चंद्रकांत पाटील

मी मुख्यमंत्री होईन, असं वचन शिवसेनाप्रमुखांना कधीच दिलं नव्हतं- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या