भिवंडीत इमारत कोसळली; एका मुलीचा मृत्यू, 10 ते 15 जण अडकले

भिवंडी | भिवंडीत 4 मजली इमारत कोसळलीय. नवी वस्ती भागात सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय. 

अग्नीशमन दलाला घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रीन कॅरीडॉर तयार करण्यात आलाय. 

दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 5 जणांना बाहेर काढण्यात आलंय. आणखी 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे)