Top News

धक्कादायक!!! भिवंडीत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन निघृण हत्या

मुंबई | 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आलीय. भिवंडीच्या नर्पोली भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मृत मुलगी आई-वडील आणि मोठ्या भाऊ-बहिणीसोबत नर्पोली भागात राहते. तिचे आई-वडील मजुरीचं काम करतात. शाळेतून परतल्यानंतर मुलगी घरात एकटीच होती. याचाच फायदा घेत आरोपीनं अगोदर या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलंय. 

मुलीचा भाऊ घरी परतल्यानंतर त्याला घराचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसला. घरात येताच त्यानं आपल्या बहिणीचं प्रेत जमिनीवर अत्यवस्थ अवस्थेत पडलेलं पाहिलं. त्यानंतर त्यानं केलेल्या आरडा-ओरडीनंतर शेजारी गोळा झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

-पोरींनी देशाचं नाव काढलं; मारली अंतिम फेरीत धडक…

-अटलजींच्या अस्थीकलश दर्शनावेळी भाजप मंत्र्यांचा हास्यविनोद, व्हीडिओ व्हायरल

-चाहत्याच्या आवाहनामुळे केरळवासियांना 1,00,00,000 एवढ्या रूपयांची मदत, कोण आहे हा अभिनेता?

-‘मुंगळा’ नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला, हेलनला टक्कर देणार ‘ही’ अभिनेत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या