बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेला अटक!

बारामती | बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत लोकांकडून पैसे उकळवणाऱ्या भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगून भोंदू बाबा मनोहर भोसलेनं बारामतीतील तरुणाची फसवणूक केली होती. या फसवणूकीत बाबा मनोहर भोसलेनं तरुणाला तब्बल 2 लाख 51 हजारांचा गंडा घातला.

2 लाख 51 हजारांची फसवणूक प्रकरणी अखेर भोंदू बाबा मनोहर भोसलेला बारामती पोलीस आणि पुणे एलसीबीनं अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील ‌सालपे गावातील एका फार्महाऊसवरुन त्याला अटक करण्यात आली.

बारामती येथे राहणाऱ्या शशिकांत सुभाष खरात यांच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत घेतला. शशिकांतच्या वडिलांना थायरॉईड आणि कॅन्सर झाला होता. मनोहर मामा भोसले यानी स्वतः बाळू मामांचा अवतार असल्याचा बनाव करत शशिकांतच्या वडिलांना झालेल्या कॅन्सरवर उपाय म्हणून बाभळीच्या पाला, साखर आणि भंडारा खाण्यास देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. पैसे परत मागितले तर जीवे मारण्याची धमकीही भोंदू बाबानं दिली होती.

दरम्यान, भोंदू बाबा मनोहरमामा भोसलेवर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा, जादूटोणा आणि उच्चाटन कायदा तसंच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, आम्ही आणखी उजळ माथ्याने समोर येऊ – छगन भुजबळ

गणपती बाप्पांचा पायगुण अन् या 8 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण नाही

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, वाचा आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

नरेंद्र मोदीच्या काळात लक्ष्मी, दुर्गा, सरस्वतीची शक्ती कमी झाली- राहुल गांधी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More