Bhole Baba Suraj Pal Property | हाथरस घटना घडल्यानंतर भोलेबाबा (Bhole Baba) उर्फ सूरजपाल फरार आहेत.नारायण साकार विश्व हरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भोले बाबांची एकूण संपत्ती आता समोर आली आहे. भोले बाबा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या तसेच इतर संपत्ती आहे.
2 जुलैरोजी भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत 121 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हाथरस घटनेनंतर भोलेबाबा फरार असून ते अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अशात (Bhole Baba Suraj Pal Property) त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा हा समोर आला आहे.
हाथरस घटनेनंतर भोलेबाबा फरार
भोले बाबाचे 100 कोटी रुपयांचे मोठे साम्राज्य आहे. त्यांचे एक-दोन नव्हे तर 24 आश्रम आहेत. बघायला गेलं तर, भक्तांच्या मते भोले बाबा एक रुपयाही दान म्हणून घेत नाहीत. मात्र, त्यांनी अतिशय हुशारीने अनेक ट्रस्ट तयार करून त्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली आहे. उत्तर प्रदेशात तर त्यांचे राजवाड्यासारखे आश्रम आहे.
त्यांच्याकडे जवळपास तब्बल 100 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये मुख्यतः स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. भोले बाबा यांचे देशभरात सुमारे 24 आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे. सूरज पाल सिंह जाटव यांनी 24 मे 2023 रोजी त्यांची सर्व मालमत्ता नारायण विश्व हरी ट्रस्टच्या नावावर दिली होती. हा ट्रस्ट फक्त भोलेबाबांचे (Bhole Baba Suraj Pal Property) सर्वात विश्वासू सेवक चालवतात.
भोले बाबाची एकूण संपत्ती किती?
त्यांच्या मैनपुरी आश्रमात लावण्यात आलेला बोर्ड पाहिला तर त्यामध्ये सर्व देणगीदारांची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये 10,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांचा उल्लेख आहे. या भोलेबाबाने स्वत:च्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याऐवजी स्थानिक लोकांना विश्वस्त बनवले असल्याचंही समोर आलंय.
या भोले बाबांनी गुलाबी सैन्याची स्थापना केली आहे. गुलाबी सैनिकांच्या या सैन्यात भोलबाबाचे वैयक्तिक 100 ब्लॅक कॅट कमांडो (Bhole Baba Suraj Pal Property) देखील सामील होते. इतकंच नाही तर, त्यांच्याकडे आलिशान वाहने देखील आहेत. या ताफ्यात प्रत्येक वेळी 25 ते 30 वाहने असायची. तसेच भोलेबाबा स्वत: फॉर्च्युनर कार चालवत असत. याशिवाय मैनपुरी, बिधनू, इटावा, कासगंज आणि नोएडा येथे भोलेबाबाचे राजवाड्यासारखे आश्रम आहेत.
News Title – Bhole Baba Suraj Pal Property
महत्वाच्या बातम्या-
..अन् अभिनेत्रीने थेट सलमान खानच्या कानाखाली लगावली; नेमकं असं काय घडलं होतं?
मुंबईतील मुसळधार पावसानंतर अजित पवारांचं ट्वीट; म्हणाले,”हवामान बदलामुळे..”
नवी मुंबईतील रेल्वेरूळावर घडली धक्कादायक घटना, महिलेच्या पायावरून थेट….
मुंबईकरांनो जरा बचके! हवामान खात्याचा हायअलर्ट, पुढील 24 तास..
रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटकांची उडाली तारांबळ; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO