कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ची कोट्यवधींची कमाई, आकडा ऐकून थक्क व्हाल
मुंबई| कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा ‘भूल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या थिएटर मध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. साऊथ चित्रपटानंतर आता बॉलिवूड चित्रपटांनी देखील चांगलीच बाजी मारली.
KGF 2, RRR, पुष्पा: द राईज या सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमवला. सुपरहीट साऊथ चित्रपटांपाठोपाठ 20 मे रोजी प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा ‘भूल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे.
हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘भूल भुलैया 2’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन सादर केलं आहे. या पोस्टनुसार चौथ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ‘भूल भुलैया 2’ ने रिलीजच्या चौथ्या आठवड्यात मंगळवारी 1.29 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशा प्रकारे चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई 173.76 कोटींवर पोहोचली आहे. अजूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे जितका सुरुवातीला होता.
दरम्यान, प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या हॉरर कॉमेडीच्या रिलीजची वाट पाहत होते. या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन पाहता प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बंपर यशानंतर चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी!
सर्वसामान्यांना झटका; आता नवीन गॅस कनेक्शनसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रूपये
‘आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो आणि…’; भाजप खासदाराच्या खास शुभेच्छा
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येतबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
चिंताजनक बातमी! देशातील कोरोना रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर
Comments are closed.