बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मंजुलिका’ पुन्हा परतली….; ‘भूल भुलैंया 2’ चा धमाकेदार टीझर रिलीज

मुंबई | बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) व अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा ‘भूल भुलैंया 2’ (Bhool Bhulaiyyaa) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून टीझर बघून प्रेक्षकांच्या अंगावरही काटा आला.

एका मधुर गाण्यापासून सुरू झालेल्या टीझरमध्ये एक जूना आणि झपाटलेला बंगला दाखवण्यात आला आहे. एका क्षणात दृश्य बदलते आणि समोर एक भीतीदायक आकृती दिसते. आणि पुढच्या क्षणी कार्तिक आर्यन तांत्रिकाच्या वेशात पाहायला मिळत आहे.

कार्तिक आर्यनचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी व्यतिरिक्त अभिनेत्री तब्बू (Tabbu), राजपाल यादव (Rajpal Yadav) यांसारखे मुरलेले कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट 20 मे पासून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

दरम्यान, अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैंया’ चित्रपट सुपर हिट ठरला होता. त्यामुळे ‘भूल भुलैंया 2’ देखील प्रेक्षकांना भुरळ पाडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्यातरी 54 सेकंदांचा हा दमदार टीझर बघून प्रेक्षक चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

थोडक्यात बातम्या-

चक्क 1 रूपयांत मिळणार 1 लीटर पेट्रोल, जाणून घ्या कुठे मिळतीये ऑफर

अखेर NCB ला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची वर्णी

सुजात आंबेडकर राजकारणात येणार?, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

‘तुम्ही राज्य चालवताय, का हजामत करताय?’, राजू शेट्टी संतापले

पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More