गँगरेपला ‘फिल्मी कहाणी’ म्हणालेल्या पोलिसासह 7 जणांचा निलंबन!

भोपाळ | 19 वर्षीय मुलीवर झालेल्या गँगरेपला फिल्मी कहाणी म्हणणाऱ्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाई करण्यात आलीय. मोहित सक्सेना असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्यासह 7 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. 

हबीबगंजमध्ये रेल्वे स्टेशनवरुन अपहरण करुन तरुणीवर गँगरेप करण्यात आला होता. तीन तास आरोपींनी पीडित मुलीच्या शरीराचे लचके तोडले. 

दरम्यान, जेव्हा पीडित मुलगी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचली तेव्हा सक्सेनानं फिल्मी कहाणी नको सांगू, असं या मुलीला दरडावलं होतं. घटनेचं गांभीर्य ओळखून रेल्वे पोलीस महानिरीक्षकांनी 7 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन केलं.