पुणे | भोर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 17 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.
भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निर्मला रामचंद्र आवारे यांची निवड झाली आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हा विजय मिळवला आहे.
भोर नगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी विरोधकांनी मोठी प्रयत्नांची शर्थ केली होती, मात्र त्यांना एक जागाही जिंकता आली नाही. सध्या भोरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष सुरु आहे.
काँग्रेसचे विजयी उमेदवार-
भोर (पुणे) नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८,
काँग्रेस पक्षाने १८ पैकी १८ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.
सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. pic.twitter.com/naGeJr9x3p— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 16, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची कबुली
-…आपण मात्र हिंदू-मुस्लीम खेळ खेळत बसलोय; हरभजनचं विचार करायला लावणारं ट्विट
-नितीन गडकरींच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून राडा!
-धक्कादायक!!! खर्च कमी करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!
-महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी