भोसरीत भाजपच्या लांडगेंचा टांगा पलटी होणार, लांडे घोडे फरार करणार?

Bhosari Assembly Vilas Lande vs Mahesh Landge

Bhosari Assembly | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीसह महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता प्रचाराला देखील लागले आहेत. उमेदवाऱ्या याद्या जाहीर होतायेत तशा दोन्ही आघाडीमध्ये बडखोरीचं सत्र दिसून येतंय. इच्छुक उमेदवार हे नाराज होत आहेत. अशात अजित पवार गटाचा एक नेता हा थेट शरद पवारांचा प्रचार करणार असल्याचं कळतंय. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Bhosari Assembly)

विलास लांडे हे शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेने भाजपचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची कोंडी होणार असल्याचं दिसून येतंय. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे आमदार महेश लांडगेंना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर, महाविकास आघाडीकडून येथे शरद पवार गटाने अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे.

लांडे vs लांडगे

अगोदर या जागेवर ठाकरे गट आणि शरद पवार गट या दोन्ही पक्षांनी दावा ठोकला होता. मात्र,नंतर ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार विलास लांडे हे देखील भोसरीतून निवडणुकीसाठी इच्छुक होते. यासाठी ते शरद पवारांच्या देखील संपर्कात होते. लोकसभेसाठी देखील ते इच्छुक होते. आता विधानसभेसाठी देखील त्यांना संधी मिळाली नाही.  ही जागा महायुतीमध्ये भाजपला सुटली. (Bhosari Assembly)

अशात माजी आमदार विलास लांडे आता थेट शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. महायुतीत राहून त्यांनी मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. यामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह आता समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी

विलास लांडे यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. भोसरी बकाल झाली, भोसरी दहशतीखाली वावरते, असं म्हणत विलास लांडे यांनी महायुतीचे उमेदवार लांडगेंना लक्ष केलं आहे. तर, शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणेंनी विलास लांडे माझ्यासोबत होते, आहेत, अन् पुढंही राहतील असं म्हणत शड्डू ठोकला आहे. आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. (Bhosari Assembly)

News Title –  Bhosari Assembly Vilas Lande vs Mahesh Landge

महत्त्वाच्या बातम्या-

जळगावात महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान

शरद पवारांची मोठी खेळी; ‘या’ जागेवर महायुतीच्या ‘नाकी नऊ’ आणणार

युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक; नेमकं काय म्हणाले?

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरचे वडील ‘या’ भागातून निवडणूक लढवणार

एकही जागा न मिळाल्याने आठवले महायुतीत नाराज?, रिपाई स्वबळावर लढणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .