बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भोसरीकरांसाठी खूशखबर; वाहतूक कोंडीमुक्त उड्डाणपुलासाठी ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’

आमदार महेश लांडगे यांच्या "भोसरी व्‍हीजन-२०२०"ची वचनपूर्ती

पिंपरी । पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अत्यंत चर्चेत असलेला भोसरी उड्डाणपूल आता मोकळा श्वास घेणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून या पुलाखाली ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थायी समितीकडून बुधवारी मान्यता देण्यात आली.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या ‘भोसरी व्‍हीजन-२०२०’ मध्ये भोसरी उड्डाणपुलाखाली होणारी कोंडी आणि वाहतूक सक्षमीकरणचा संकल्प करण्यात आला होता. उड्डाणपुल उभारताना नियोजनाचा अभाव असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आमदार लांडगे यांनी उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

ट्रॅव्‍हल्स आणि बसचे नियमबाह्य पार्किंग, अतिक्रमण, पथारीधारकांचे स्टॉल्स, मजूर अड्डा यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे भोसरीचा उड्डाणपूल म्हणजे वाहनचालकांसाठी डोकेदुखी असे समीकरण झाले आहे. रस्त्यावर पादचाऱ्यांचा वापर अधिक असल्याने अशा ठिकाणी विद्यार्थी,  ज्येष्ठ नागरिक, महिलांना अपघाताला सामोरे जावे लागते. याबाबींचा विचार करता हे रस्ते पादचा-यांची सुरक्षितता विचारात घेऊन ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’नुसार विकसित केल्याने अपघातांची संख्या कमी होणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने उद्या (दि.१९) या प्रकल्पाचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम आगामी एक वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका स्थापत्य विभागाने दिली.

कसं असेल ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’?

– रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक
– स्वतंत्र सायकल ट्रॅक
– पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था
– दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था
– गार्डन, ई- टॉयलेट.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More