बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग मिळाला तर आमच्या शुभेच्छा”

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanajay Raut) यांना (31 जुलै) रोजी ईडीने (ED) अटक केली होती. पत्राचाळ घोटळाप्रकरणी त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी (ED custody) सुनावण्यात आली होती. परंतु राऊतांना गुरूवारी पुन्हा न्यायलयात हजर करण्यात आले होते, तेव्हा न्यायालयाने राऊतांच्या कोठडीत वाढ करून 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे.

संजय राऊतांच्या ईडी कोठडीवर बोलताना माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले की, ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग मिळाला तर आमच्या शुभेच्छा, असं म्हणत भुजबळांनी राऊतांना टोला लगावला. तर एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) प्रभाग रचनेवर बोलताना ते म्हणाले, शिंदेंनी प्रभाग रचना का बदलली हे सांगता येणार नाही.

तसेच भुजबळांनी राज्यपालांची भेट घेतली होती, त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, आम्ही राज्यपालांकडे मागणी केली आहे की, शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांना मदत करा. 92 नगरपालिका, 4 नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही, तसेच बांठिया कमिशनमध्ये ओबीसींची संख्या कमी दाखवली जात आहे, तसेच अहवालात अनेक त्रुटी असल्याने राज्यपालांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही राज्यपालांकडे केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावरही भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही, माहित नाही, अनेक याचिकांची गुंतागुंत न्यायालयात सुरू आहे ती कशी सुटते ते बघावे लागणार आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मंगळसूत्र गळ्यात घातलं तर वाटतं पतीने गळाच पकडला आहे’-अमृता फडणवीस

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार

संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; ईडीच्या तपासात महत्त्वाची समोर

‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More