बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

OBC Reservationचा वाद पेटला! भुजबळ म्हणतात,”फडणवीस त्यांना थांबवत का नाहीत?”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC Political Reaservation) स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून (MVA Government) ओबीसी आरक्षणावर काढण्यात आलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगित केला आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chagan Bhujbal) यांनी यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opppsition Leader Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे.

आजचा न्यायालयाचा निर्णय क्लेशदायक आहे. आम्ही केंद्र सरकारला इम्पेरिकल डाटा (Emperical Data) मागत आहोत. आवश्यक ते सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. पण काही लोक ओबीसी आरक्षण संपवण्याचा मोठा प्रयत्न करत आहेत. ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. फडणवीस म्हणतात मी पाठिंबा देतो पण यांचेच लोक न्यायालयात जातात, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षण संपवण्यात षडयंत्र असल्याचं मला 100 टक्के वाटतं, असं खळबळजनक वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाचं नुकसान करत आहेत. देवेंद्र फडणवीस या सर्व लोकांना का नाही थाबंवत? हे मला त्यांना विचारायचं आहे. मी लवकरच या मुद्द्यावर फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चागलीच राजकीय लढाई चालू झाली आहे. ओबीसी समाजाचं राजकीय भविष्य सध्यातरी अधांतरी आहे हे मात्र नक्की.

थोडक्यात बातम्या 

“उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही, खरा वाघ पहायला अधिवेशनात येणार”

“निवडणूक आली की आमच्या विरोधकांच्या अंगात येतं”, अजित पवारांचा टोला

“विषय राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे”, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

‘…तरच राज्यात Lockdownचा निर्णय होईल’; राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

‘त्या’ घटनेला जबाबदार कोण?; अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More