बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजूनही मनुवादी जिवंत असल्यानं ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय'”

धुळे | गेल्या कित्येक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर परखडपणे बोलताना दिसतात. या मुद्यावरून ते सतत केंद्र सरकारला सवाल करत आरक्षणाची मागणी करत असतात.

अशातच आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधातील नेत्यांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले आहेत. ओबीसींच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय. यापुढे देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. मात्र, हा लढा निकराने लढत आपल्याला पुढे जायचं आहे, असं भुजबळ यांनी धुळ्यातील एका सभेत बोलताना म्हटलं आहे.

तसेच सध्याचा काळ हा ओबीसींची परीक्षा घेणारा काळ आहे. मात्र, आपल्याला त्यावर मात करत पुढे जायचं आहे. देशात अजूनही मनुवादी जिवंत आहेत. त्यामुळे त्रास हा होणारच आहे. परंतु यामुळे घाबरून चालणार नाही, असं देखील भुजबळांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाविषयी मत व्यक्त केलं. या बैठकीला राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या –

“संज्या ते पवार कुटुंब आहे, शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील”

“हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात मग सोनिया गांधी पंतप्रधान का बनू शकत नाहीत?”

भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा आमसभेत भाषण देतोय- नरेंद्र मोदी

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More