कुठं घेऊन चाललायत महाराष्ट्र माझा?- अजित पवार

उस्मानाबाद | भाजपने सत्तेत येण्यापूर्वी विविध आश्वासने दिली. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशा प्रकारची जाहिरात करुन जनतेला भुलवले. मात्र ज्याप्रकारे राज्य सरकारचे काम चालू आहे त्यावरून आम्हाला सरकारला विचारावेसे वाटते की कुठं घेऊन चाललायत महाराष्ट्र माझा?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारलाय. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा भूममध्ये आली असताना ते बोलत होते. 

राज्यात 80 हजार शाळा बंद करण्याचा डाव आखला जात आहे. दूध आणि इतर शेतमालाला भाव दिला जात नाही. बेरोजगारी वाढत असून सरकार रोजगार पुरवण्यात अपयशी ठरले आहे. वीज कनेक्शन तोडणे, कर्जमाफीत पळवाटा काढणे यातून शेतकरीवर्गाला सरकारने त्रस्त केले आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.