Bhumi Pednekar | अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचा ‘मेरे हजबंड की बीवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच, एका कार्यक्रमात तिने चित्रपटसृष्टीतील कारकीर्द आणि इतर विषयांवर मनमोकळी चर्चा केली. यावेळी, तिला चित्रपटसृष्टीतील महिलांचे शोषण आणि कास्टिंग काउचबद्दल विचारण्यात आले.
चित्रपटसृष्टीतील महिलांचे शोषण
भूमीने सांगितले की, चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउच अस्तित्वात आहे. जरी तिला स्वतःला याचा अनुभव आला नसला, तरी तिने जवळच्या लोकांकडून याबद्दल ऐकले आहे. तिने हे देखील सांगितले की, तिने तिच्या करिअरची सुरुवात कास्टिंग डायरेक्टर म्हणून केली होती, त्यामुळे ती महिला कलाकारांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असे. जेव्हा एखाद्या मुलीची ऑडिशन असायची, तेव्हा ती स्वतः तिथे उपस्थित राहत असे.
भारतातील महिला असुरक्षित
भूमीने केवळ चित्रपटसृष्टीबद्दलच नाही, तर संपूर्ण भारतात महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. ती म्हणाली, “आज आपल्या देशात एक स्त्री म्हणून मला भीती वाटते. फक्त या बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतच नाही, तर आज सगळीकडेच महिला असुरक्षित आहेत.” तिने पुढे सांगितले की तिची चुलत बहीण, जी कॉलेजमध्ये शिकते आणि मुंबईत (Mumbai) तिच्यासोबत राहते, ती जर रात्री ११ वाजेपर्यंत घरी आली नाही, तर तिला काळजी वाटते.
चित्रपटसृष्टीतील अनुभव
भूमीने (Bhumi Pednekar) सांगितले की ,तिने स्वतः कास्टिंग काउचचा अनुभव घेतला नाही. परंतू तिने तिच्या जवळच्या व्यक्तींकडून याबद्दल ऐकलं आहे. तिने तिच्या करियरची सुरूवात कास्टिंग डायरेक्टर म्हणून केली होती.
Title : Bhumi Pednekar Feels Unsafe in India