Top News राजकारण

सुशांतसाठी मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकरने घेतला मोठा निर्णय

मुंबई | सुशांत सिंग राजपूच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देश हळहळला. सुशांतच्या अशा अकाली जाण्याने त्याच्या कुटंबियांना तसंच मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. अनेक अभिनेत्यांनी सुशांतला सोशल मिडियावरून श्रद्धांजली वाहिलीये. तर अभिनेत्री भूमी पेडणेकरने सुशांतच्या आठवणीत गरजूंना अन्नदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नुकतंच भूमी पेडणेकरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भूमीने 500 हून अधिक जणांना जेवण उपलब्ध करुन देणार असल्याचं सांगितलंय. सुशांत हा भूमीचा एक चांगला मित्र होता. त्यामुळेच त्याच्यासाठी ती हे कार्य करणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

🙏 . . . @eksaathfoundation

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

 

पोस्टमध्ये भूमी म्हणते, “माझा मित्र सुशांत याच्या आठवणीत मी ‘एक साथ’ या फाऊंडेशनच्या माध्यमातून 550 गरीब कुटुंबांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना या काळात मदतीची आणि प्रेमाची गरज आहे अशांसाठी काही तरी केलं पाहिजे.”

यापूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्याची पत्नी प्रज्ञा कपूर यांनी देखील 3400 कुटुंबाना अन्नवाटप केलं होतं. अभिषेक कपूर देखील सुशांतचा जवळचा मित्र होता. प्रज्ञाच्या ‘एक साथी’ या संस्थेअंतर्गत त्यांनी ही मदत केली होती. त्याच संस्थेअंतर्गत भूमिदेखील गरजुंमध्ये अन्नदान करणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

  सॅमसंगचा नवा स्मार्टफोन ; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….

धक्कादायक! 24 तासांत बीएसएफचे 53 जवान कोरोनाबाधित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या