बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील ‘या’ भागाला मोठा दिलासा, बहुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजन संपन्न

पुणे | सिंहगड रोड येथे राजाराम पूल ते फनटाईम थिएटर दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झालं. या उड्डाणपुलामुळे वडगाव धायरी, नऱ्हे, किरकिटवाडी, खडकवासला, पानशेत, सिंहगड आदी भागातील नागरिकांना जाण्यास उपयुक्त होणार आहे.

भूमिपूजनाला महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्‍ता टिळक, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्‍त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

पुण्याची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्‍त शहर म्हणून होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. पुणे शहरालगतचे रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्यात येईल, असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केलं.

सिंहगड रोड उड्डाणपुलामुळे वाहतूक समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. या पुलावर ‘डबलडेकर’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे-मुंबईसह राज्याला केंद्र सरकारकडून जेवढी मदत देता येईल, तेवढी दिली जाईल, असं नितीन गडकरी म्हणालेत. तसेच पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू आहे, ही चांगली बाब आहे. नदी सुधार, रोप-वे व अन्य विकास प्रकल्पांसाठी सहकार्य केले जाईल, असंही नितीन गडकरी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

UPSC Result | लातूरच्या पूजा कदमने अंधत्वावर मात करत युपीएससीत मिळवलं यश

मुंबई विमानतळावर ‘इतके’ हजार प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More