बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूमिपूजन संपन्न

पुणे |  आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची कार्य पार पाडण्यात अग्रगण्य प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या राज्यातील सर्वात मोठ्या आयसीयूचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. इस्काॅन गोवर्धन इकोव्हिलेजचे डायरेक्टर गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमाला कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, गुगल इंडियाचे हेल्थ केअर विभाग प्रमुख गुलजार आझाद, ट्रान्सट्रेडिया युनिर्व्हसिटीचे चेअरमन उदीत शेठ, गोवर्धन इकोव्हिलेजचे सोशल इनिशिटिव्ह प्रमुख यचनित पुष्कर्णा, राज्यपालांचे विशेष कार्यकारी अधिकारी राकेश नैथानी, कुलगुरु डॉ. व्ही. एन. मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शांती, समुध्दी आणि सुखाची गुरुकिल्ली ही गीतेत आहे. आज जग मानसिक विकांरानी ग्रासलेले आहे, त्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे टाळायचे असेल तर गीतेतील संस्कार आपल्याला मानसिक ताण तणावातून मुक्तता देऊ शकतात, असं गौरंगदास प्रभू यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी, भारत एक सुपर पॅावर देश होण्यासाठी प्रवरा मॅाडेल एक आदर्श उदाहरण असून गेल्या पन्नास वर्षापासून विखे पाटील कुटुंबीयाकडून ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावशाली कार्य सुरु आहे. प्रवरा परिवार समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचत असल्यातचे मोठे समाधान आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमाला गुगल हेल्थ केअरचे प्रमुख गुलजार आझाद उपस्थित होते. खेड्यातील एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या दूरदृष्टीने आरोग्य सेवेचा संकल्प करीत हजारो डॉक्टर घडविले आहेत ही देशातील एक मोठी क्रांतीच आहे, असं गुलजार म्हणाले आहेत.

प्रवरा हा स्वतंत्र भारतातील सगळ्यात परिपुर्ण मॅाडेल असल्याचं मत देखील आझाद यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, महतं उध्दव महाराज मंडलीक, प्रवरा मेडीकल ट्रस्ट विश्वस्त सुर्वणा विखे पाटील, मोनिका सावंत, कल्याण आहेर पाटील, ध्रुव विखे पाटील, नंदकिशोर राठी, कैलास तांबे, डॉ प्रमोद म्हस्के उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या – 

“राज यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, ते कोणाचे…”, चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं तोंडभरून कौतूक

राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर युक्रेनियन नौसैनिकांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता

मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More