बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रवरा ग्रामीण महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते संपन्न होणार

लोणी | प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा इन्स्टिट्युट ॲाफ मेडीकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्या प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन तसेच डॉ बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचा उदघाट्न समारंभ राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बुधवारी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एन. मगरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रवरा इन्स्टिट्युट ॲाफ मेडीकल सायन्सेस अभिमत विद्यापीठ 2022-23 या वर्षात मध्ये सुरु करीत असलेल्या नविन आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय इमारतीचा भूमीपूजन तसेच पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने यंदा वर्षीपासून आंतराराष्ट्रीय दर्जाचे रिसर्च फाउंडेशन स्थापन करत आहे. या फाउंडेशनचे उदघाट्न समारंभा संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ मगरे बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ एस. आर. वाळुंज उपस्थित होते.

डॉ मगरे यांनी प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय विखे पाटील तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार असल्याचे सांगत या आयुर्वेद महाविद्यालयात पुढच्या वर्षीपासून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 150 कॅाटचे नविन आधुनिक रुगणालय स्थापन केले जाणार आहे. ज्यामुळे प्रवरा मेडिकल ट्रस्ट मार्फत नागरिकांना आधुनिक आरोग्य सेवा सह आयुर्वेदिक उपचार एका ठिकाणी मिळणे शक्य होणार असल्याचं डॉ मगरे यांनी सांगितलं.

डॉ बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशन माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी असलेल्या कराराच्या माध्यामातून आरोग्य क्षेत्रात नविन निदान पध्दती, नविन उपचार पध्दती आणि औषध उपचार यासाठी संशोधन केले जाणार असल्याचे यावेळी पुढे बोलताना डॉ मगरे यांनी सांगितले. प्रवरा परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन डॉ मगरे यांनी यावेळी बोलताना केले.

थोडक्यात बातम्या-

“अंबानी आणि संघातील एका व्यक्तीने मला 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला”

मोठी बातमी! भीमा कोरेगाव प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More