बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

गांधीनगर | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर आता सध्या गुजरातमधील राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचं पहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानं अनेकांना धक्काच बसला होता. त्यानंतर आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. आनंदीबेन पटेल आणि पंतप्रधान मोदी यांचे जवळचे सहकारी म्हणून भूपेंद्र पटेल यांची ओळख आहे. अहमदाबादमधील घाटलोहिया या मतदार संघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना धक्का देत त्यांची निवड करण्यात आली आहे.

गुजरातच्या नवीन मुख्यमंत्री पदासाठी कॅबिनेट मंत्री मनसुख भाई मांडविया, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला गुजरात प्रदेश भाजपाध्यक्ष सीआर पाटील, लक्षद्वीप लेफ्टनंट राज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल या पाच नावांची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अखेर भूपेंद्र पटेल यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

दरम्यान, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठे फेरबदल केल्याचं पहायला मिळतंय. भाजप कार्यकारणीची बैठक पार पडली . त्यावेळी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री बदलाचा गुजरातच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

राजस्थानची चिंता मिटली! आयपीएलआधी ‘या’ नव्या खेळाडूची तुफान खेळी

‘महिलांच्याबाबतीत सरकार असंवेदनशील’; राष्ट्रीय महिला आयोगाने ठाकरे सरकारला फटकारलं

‘तिचीच चूक असणार’; हेमांगी कवीची मन हेलावून टाकणारी पोस्ट

बेरोजगार युवकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय!

“हवेत गोळीबार करू नका, चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More