बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिग्गजांना डावलून भूपेंद्र पटेल यांची निवड; वाचा कोण आहेत भूपेंद्र पटेल?

गांधीनगर | विजय रूपाणी यांनी काल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. आज सकाळपासूनच अहमदाबादमध्ये भाजपची बैठक सुरू होती. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची आज दुपारी भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये निवड करण्यात आली आहे.

भूपेंद्र पटेल गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आपल्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भूपेंद्र पटेल पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भूपेंद्र पटेल यांनी याआधी अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. तसेच अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष होते. भूपेंद्र पटेल हे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भूपेंद्र पटेल यांनी आपली संसदीय कारकीर्दीची सुरूवात 2017 साली केली आहे. 2017 साली भूपेंद्र पटेल पहिल्यांदाच घाटलोदिया या मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. घाटलोदिया हा मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा 1,17,000 च्या मतांनी पराभव केला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या मतदार संघात आपला प्रभाव वाढवला होता.

दरम्यान, भूपेंद्र पटेल यांची अनेक दिग्गजांना डावलत मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे नेते आहेत. त्यामुळेच आगामी 2022 च्या विधानसभेच्या निवडणुकीची खास जबाबदारी पटेल यांच्या खांद्यावर असणार आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत नसताना सुद्धा त्यांची निवड करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली??? ;रशियाने तालिबान्यांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, अमरावतीत चार दिवसात दुसरा प्रकार

पावसाचं रौद्ररूप! कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

‘शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं’; बाळासाहेब थोरातांचं पवारांना आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More