बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेत्याच्या पत्नीचं कोरोनानं दुःखद निधन

मुंबई | प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं आज कोरोनामुळे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 39 व्या वर्षी कादंबरी यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

भूषण कडू हे प्रसिद्ध विनोदी अभिनेते व बिग बॉस मराठी फेम आहेत. भूषण यांनी विविध मराठी कार्यक्रमात सर्वोत्तम विनोदी भूमिका पार पाडली आहे. त्याशिवाय त्यांनी मराठी बिग बॉसमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

कोरोनाची लागण झाल्यानंतर कादंबरी यांना ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची कोरोनाशी होत असलेली लढाई अखेर अपयशी ठरली. भूषण कडू यांच्या कादंबरी या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या अशा अकाली जाण्याने कडू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कादंबरी कडू आणि भूषण कडू यांना प्रकिर्थ नावाचा 7 वर्षांचा एक मुलगा आहे. आईच्या अशा अकाली निधनाने त्या चिमुकल्यावरही दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. भूषण यांनी विनोदाच्या माध्यमातून खूप मोठं नावलौकिक प्राप्त केलं आहे. त्यांच्या पत्नीच्या जाण्याने स्वभावाने हळव्या असलेल्या भूषण यांना जबर धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

खोटं ओळखपत्र बनवून लसीकरण केल्यासंदर्भात वादात सापडलेल्या अभिनेत्रीने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

साखरपुडा झाल्यानंतर प्रियकराने दिला लग्नाला नकार, प्रेयसीने केलं असं काही की…

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं आगमन उशिराने होणार; हवामानतज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

शनिवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More