बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर बलात्काराचा आरोप; तीन वर्ष अत्याचार केल्याचा दावा

मुंबई | बॉलिवूडमधून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशातच आता ‘टी सिरीज’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार यांच्यावर एका 30 वर्षीय महिलेनं बलात्काराचा आरोप केल्याचं समोर येत आहे. काम मिळवून देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप भूषण कुमारवर करण्यात आला आहे.

पीडित महिलेनं भूषण कुमार यांनी ‘टी सिरीज’ कंपनीत काम मिळवून देण्याचा आमिष दिला आणि बलात्कार केला, असं पीडित महिलेचं म्हणणं आहे. त्यामुळे तिनं भूषण कुमार यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. आगामी प्रोजेक्टमध्ये काम देण्याचं सांगत त्यांनी फायदा उचलल्याचंही महिलेनं म्हटलं आहे.

आरोपानुसार, काम देण्याच्या नावाखाली भूषण कुमार यांनी सन 2017 पासून ते 2020 पर्यंत 3 वर्ष सतत गैरकृत्य केल्याचं पीडित महिलेनं सांगितलं आहे. पीडिताने तीन लोकेशनचा दावा सांगत, संबंधित ठिकाणी आपल्यावर लैगिक शोषण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, 2018 मध्येही मीटू कॅम्पेनवेळीही भूषण कुमार यांच्यावर एका बलात्काराचा आरोप होता. तसेच ते केवळ ‘टी सिरीज’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नसून अनेक मोठमोठ्या चित्रपटांच्या निर्माते देखील आहेत.

थोडक्यात बातम्या – 

ईडीची अनिल देशमुखांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्या कोटींची संपत्ती जप्त

शुभमंगल सावधान! अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात

“तिसऱ्या लाटेला सामोरे जायला आपण सज्ज असलो, तरी पुण्यातील निर्बंध कायम राहणार”

“बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील”

‘पुण्याची मस्तानी जगात भारी, तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More