बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींची तुलना आहिल्याबाईंसोबत केल्याने भूषणसिंह राजे होळकर आक्रमक, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेचे नेेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ममता बॅनर्जी यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याशी तुलना केली होती. यावरून होळकर घराण्याकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. होळकर घराण्याचे भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

ज्या पद्धतीने लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. आपण पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये आपण जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेते मंडळींशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा भूषणसिंह राजे होळकर यांनी दिला आहे.

राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये जर आपण राष्ट्रपुरुषांची नावे वापरुन त्यांची तुलना जर आजच्या नेत्यांशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. या पत्रात राऊतांनी ममता बॅनर्जी यांना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणारा नेता असंही संबोधलं आहे. तसंच अहिल्याबाईंचे विचार आचरणात आणून त्यांच्यासारखी कृती केल्यावर जनता आपली योग्यता ठरवेल असंही भूषणसिंह राजे होळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रयतेचे कल्याण हेच सर्वोपरी मानून संपूर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मासाहेब यांची तुलना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या आजच्या युगातील एका नेत्याशी कधीच होऊ शकत नाही. आधी अहिल्या मासाहेबांचे विचार आचरणात आणा, त्यांच्या सारखा रयतेचा सांभाळ करा मग जनता ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही अशी टीका भूषणसिंह राजे होळकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! कोरोनामुळे होणाऱ्या ‘या’ आजारावर होणार मोफत उपचार

‘माझी आठवण काढाल तेव्हा हसून आठवण काढा’; व्हिडीओ पोस्ट करत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

‘कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा…’; अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना भरला दम

“उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही, लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या”

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार?; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More