बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी!

अहमदनगर | औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असतानाच आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्यात यावं, अशी मागणी अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली आहे. भूषणसिंह राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या संदर्भात पत्र लिहून मागणी केली आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या जोरावर त्यांनी रयतेच्या मनामनात राम भिनवला. अशा महान आणि प्रेरणादायी अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणा झाला अशी इतिहासात नोंद आहे. यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर असं नाव द्यावं, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात जन्मलेल्या अहिल्यादेवींनी संपूर्ण देशाला दिशा दाखवली. त्यांच्या महान स्मृतिवर नतमस्तक हेणारा आणि अहिल्यादेवींवर निष्ठा असणारा एक मोठा समाज महाराष्ट्रात आहे. त्या समाजाच्या भावनांचा आदर करत लवकरात लवकर नामांतर करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती भूषणराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

शेवटी आपण आपल्या भावी पिढीला कोणता इतिहास सांगणार?, जुलमी राजवटीचा की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा? याचा विचार राज्य सरकारने करावा, अशीही विनंती भूषणराजेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्याच दिवशी मोठा वाद, ‘या’ कारणामुळे भडकले इंग्रज!

“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं”

“या कारणामुळेच ‘RSS’च्या चेल्यांनी सरदार पटेलांचं नाव बदललं”

नॅशनल क्रश रश्मिका मंधना लवकरच बॉलिवूडमध्ये, उचललं हे मोठं पाऊल

उत्तर द्या ठाकरे सरकार!; पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं विचारले ‘हे’ 14 प्रश्न

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More