पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भूतानच्या राजकुमारासोबत उलूलूलूलू!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानच्या छोट्याशा राजकुमारानं लळा लावला आहे. ते त्याच्यासोबत खेळण्यात दंग असल्याचे फोटो स्वतः मोदींच्या फेसबुक आणि ट्विटरवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. 

भूतान नरेशांचं कुटुंब सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, त्यांची पत्नी जत्सुन पेमा वांगचुक आणि राजकुमार जिग्मे नामग्याल वांगचुक यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं आदरातिथ्य केलं. तसेच त्यांना 17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकाचा अधिकृत चेंडू तसेच बुद्धीबळाचा पट भेट दिला.