बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विठुरायाच्या नगरीची दुरवस्था बघवत नाही’; बिचुकलेंनी पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी दाखल केला अर्ज

पंढरपूर | आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक या दोन तरुण नेत्यांमध्ये होणार आहे. त्यात आता अभिजीत बिचुकले यांनी आपला अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत सर्वांना पहायला मिळणार आहे.

राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी पंढरपूर पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करत असल्याचं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

विठुरायाच्या नगरीची नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही. मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही, असा सवालही बिचुकलेंनी केला आहे. तसेच या निवडणुकीत निवडून येणार, असा विश्वासही अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो”

बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा गमतीदार व्हिडीओ

‘संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

‘मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे…’; त्या व्हायरल व्हिडीओवर बाबुल सुप्रियोंचं स्पष्टीकरण

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या फायनलवर कोरोनाचं सावट; गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More