बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! शेतात काम करताना काळाचा घाला, वीज पडून दोघांचा मृत्यू

पुणे |  राज्यभरात विजांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 23 सप्टेंबर पर्यंत ढगांच्या गडगडासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे.

शेतात काम करत असताना अचानक विजांच्या कडकडासह पाऊस सुरू झाला. शेतात काम करणाऱ्या कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती की, त्यांच्यासोबत काय घडणार आहे. पाऊस सुरू असताना वीज पडली आणि दोन शेतमजूरांचा आपला प्राण गमवावा लागला आहे.

बारामती तालुक्यातील कुरणेवाडीमध्ये ही दु:खद घटना घडली आहे. वीज कोसळल्याने शेतमजूर जमीनीवर कोसळल्याने त्यांना पाहण्यासाठी इतर शेतमजूर त्यांच्या मदतीसाठी धावून आले. जखमी शेतमजूरांना रूग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला आहे. तर, पद्मिनी घोरपडे या गंभीर जखमी झाल्या असुन त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या दु:खद घटनेमुळं कुरणेवाडी शिवारात शोककळा पसरली आहे. त्यामुळं गावकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांनी काळजी घेऊनच शेतामध्ये कामं करावीत, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

किरीट सोमय्या ईडीचे प्रमुख आहेत का?- सुप्रिया सुळे

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More