Buldhana News | बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील अनेक गावांना वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे.
वादळाच्या तडाख्यात पत्रे उडाले आणि त्यासोबतच चिमुकली झोपलेला झोका देखील उडाला आहे. साई भरत साखरे असं या चिमुकलीचं नाव आहे. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली
छतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला झोका बांधण्यात आला होता. या झोक्यात चिमुकली झोपली होती. मात्र वादळाच्या तडाख्यात पत्रे उडाले. पत्र्यांसोबत ही चिमुकली ज्या झोक्यामध्ये होती तो झोका देखील उडाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Buldhana News | बुलढाणा जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ
राज्यात सध्या विचित्र वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पावसाने दाणादाण सुरू आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
दोन ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या दुर्घटना थोडक्यात चुकल्या. एसटी बसवर चक्क पत्र्याची टपरी येऊन आदळली. तर दुसऱ्या घटनेत टेंभुर्णा शिवारातील स्वागत कमान कोसळली. दोन्ही घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
देशातील प्रथम महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा!
“मी त्याचा फोन उचलला नाही की तो मला शारीरिक…”,ऐश्वर्या रायने केला खुलासा
बाहेर पडताना काळजी घ्या! ‘या’ भागांत वादळी वाऱ्याचा पाऊस होणार
मोठी बातमी! मनोज जरांगे महायुतीला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसपुस?; ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा