बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात मोठी दुर्घटना! निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 12 जण जखमी

पुणे | पुण्यातील बालेवाडी परिसरातील पाटील नगर येथे सुरू असलेल्या एका निर्माणाधीन बांधकामाची इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली असून यात 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. शनिवारी रात्र अचानक इमारतीचा स्लॅब कोसळला. त्यामुळे त्याठिकाणी असलेले काही लोक ढिगाऱ्यासाखी अडकले असल्याची भीती होती. त्यानंतर अग्नीशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि जखमी लोकांना बाहेर काढण्यात आलं.

आतापर्यंत आठ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमी झालेल्या 12 जणांपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची संपुर्ण तपासणी करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“सेना-भाजपला स्पष्ट बहुमत होतं, तरीही शरद पवारांनी सरकार बनवलं, हा तर…”

“भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘त्याचा आणि समीर दाऊद वानखेडेंचा काय संबंध?’; मलिकांनी शेअर केला नवा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More