बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयची मोठी कारवाई!

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय आणि ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अनिल देशमुखांविरोधातल्या प्रकरणात सर्वात मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्या गैरव्यवहार प्रकरणी हे छापे बुधवारी टाकण्यात आले असल्याचं म्हटलं जात आहे.

सीबीआयकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं राज्यातील एकूण मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या शहरांसह 12 ठिकाणी छापे टाकले असून दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली आहे. या छाप्यासंदर्भात अधिक माहिती समोर आली नसली तरी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासाचा हा एक भाग आहे. 

छापेमारी मोहिममध्ये पोलीस आयुक्त राजू भूजबळ यांच्या अहमदनगरमधील घरावर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर छापा टाकत झडती टाकली आहे. भुजबळ आणि पाटील यांचीही ईडीने चौकशी केली होती. या प्रकरणातील संशयितांना सीबीआय अटक करु शकते अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करत असताना ईडीच्या हाती काही कॉल डीटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट डाटा सापडला असून त्याआधारावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचं समजत आहे.

थोडक्यात बातम्या –

…म्हणून मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करतीये- पंकजा मुंडे

ठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन!

मोठी बातमी! कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज

एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी

“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More