बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर मोठी कारवाई, तीन महिने कारावासाची शिक्षा

अमरावती | भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना नायब तहशीलदार मारहाण प्रकरण आणि शिवीगाळ भोवल्याचं दिसतंय. याप्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्याचा कारावास आणि 20 हजार रूपये दंड ठोठावला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील प्रकरणामुळे अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरूड तालुक्यात श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे अनेक लाभार्थीं वंचित असल्याच्या तक्रारी अनिल बोंडे यांच्याकडे आल्या होत्या. काही क्षुल्लक कारणांवरून लाभार्थ्यांना वगळण्यात येत असल्याने अनिल बोंडे वरूडच्या तहशील कार्यालयात गेले होते.

अनिल बोंडे यांनी नंदकिशारे काळे यांच्याकडे विचारणा केली होती. त्यानंतर नंदकिशारे काळे यांनी योजनेच्या कागदपत्रांसोबत पाच रूपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले होते. यामुळे अनिल बोंडे आणि नंदकिशारे काळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अनिल बोंडे यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी हा वाद मिटवला होता.

दरम्यान, नायब तहशीलदार नंदकिशारे काळे आणि अधिकारी संतापले होते. त्यांनी वरूड पोलीस ठाण्यात अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा निकाल आला असून अनिल बोंडे यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर करत अनिल बोंडे यांची सुटका देखील केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“किरीट सोमय्या चु*** आहे, तो आम्हाला अक्कल शिकवणार का?”

Sanjay Raut: “बंदुक लावा, हत्या करा, मी तुमच्या बापाला घाबरत नाही”

“चोरी पकडली जाऊ नये, म्हणून संजय राऊत बॅकफूटवर गेलेत”

“….तर मी सर्व मालमत्ता भाजपला दान करायला तयार आहे”

संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊतांचं पहिलं ट्विट, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More