बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सदा सरवणकरांना पोलिसांचा झटका, केली ‘ही’ मोठी कारवाई

मुंबई । दोन दिवसांपूर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राडा झाला. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दादर पोलिसांकडून या दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्याबाहेर गर्दी जमली असताना शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळी झाडल्याचा आरोप होत आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार केल्याप्रकरणी सरवणकरांसोबतच 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदा सरवणकरांनी जमिनीच्या बाजूने ही गोळी झाडली असल्याची माहिती सीसीटीव्ही मधून समोर आली आहे. मात्र आता पोलिसांकडून सरवणकरांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

सरवणकरांची पिस्तुल पोलिसांनी जप्त केली आहे. सोबतच त्यांना समन्सदेखील बजावला आहे. त्यांच्यावर आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम लावण्यात आले आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More