बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

मुंबई | पावसाळा तोंडावर आल्याने ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

हार्डवेअर आणि पावसाळी साहित्याची दुकाने आता सुरु करता येतील. अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतच ही दुकाने सुरु राहतील. मात्र कोरोना नियमांचं पालन न केल्यास दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झालं आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील, अशा साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु करण्यास सरकारने परवानगी दिलीये. तसेच सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट, परंतू मृतांच्या संख्येत वाढ

“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”

अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, गाड्यांची तोडफोड; पाहा व्हिडीओ

कोरोनाला रोखण्यासाठी ‘या’ आमदाराने शहरातील गल्ल्यांमध्ये फिरवला होमयज्ञ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More