बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिलायन्सच्या 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लसीकरण!

नवी दिल्ली | देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यातच येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट देखील येऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. अशातच रिलायन्सकडून 20 लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली.

रिलायन्समध्ये काम करणारे कर्मचारी, निवृत्त झालेले कर्मचारी, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचंही कंपनीकडूनच मोफत लसीकरण करण्यात येईल, असे निता अंबानी यांनी जाहीर केलं आहे.

नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे. कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा खर्च देखील कंपनी करणार आहे. नीता अंबानी यांनी यापूर्वीच कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिम राबवल्या जात आहेत. भारतानं एका दिवसात 80 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही केला आहे. यातच रिलायन्स सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स आणि रिलायन्सशी संबंधित सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्याचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुलासमोर गांजा ओढायचे इरफान खान?; व्हायरल फोटोवर बाबीलनं दिलं उत्तर, म्हणाला….

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, असं राज्यातील सरकार आहे”

आंबिल ओढा परिसरातील नागरिकांना दिलासा; न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

‘उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा’; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव

बारावीच्या परीक्षा घेऊन तुम्हाला काय वेगळं सिद्ध करायचंय?; सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More