बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात पुण्यातील रिंग रोडबाबत मोठी घोषणा?, वाचा सविस्तर

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अनेक क्षेत्रांना भरीव निधींची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कृषी क्षेत्राला आणि आरोग्या विभाग यांचा समावेश आहे. त्यासोबतच सर्वांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे पुण्याला अर्थसंकल्पातूू काय मिळणार याकडं. पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठीही पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी घोषणा केल्या आहेत.

पुण्यातील केलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्वाची घोषणा होती ती म्हणजे  पुण्यात आठ पदरी रिंग रोडची उभारणीबाबतची. पुण्यातील रिंगरोड काळाची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटींच्या आठ पदरी रिंग रोडचं काम करण्यात येणार आहे. या रिंगरोडमुळे पुण्यातील वाहतुक कोंडीची समस्या सुटणार असल्यातं अजित पवारांनी सांगितलं.

पुण्यातील केलेल्या या घोषणांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी 28 कोटी 22 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याचं अजित पवारांनी घोषणा दिली आहे. त्यासोबतच पुणे शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यातील बालेवाजी क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचंही अजित पवारांनी घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं?, पाहा एका क्लिकवर!

“मराठा आरक्षण प्रश्नी मोदी सरकारने समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला”

औरंगाबाद पाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाऊनची शक्यता

कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी राज्य सरकारने दिला भरीव निधी

‘आई मला माफ कर…’; भंडाऱ्यात अधिकारी तरूणीच्या आत्महत्येनं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More