बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 15 दिवसांचे कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात चर्चा केली आहे.

येत्या 19 एप्रिलपासून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. परंतु राज्यातील परिस्थिती लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करून येत्या जूनमध्ये परीक्षा घेण्यात येतील. त्यासंदर्भातील वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा केल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला होता त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिल्याने विद्यार्थ्यांमधील संभ्रमाचे वातावरण कमी होताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

कचऱ्यात सापडलेल्या मुलीला अभिनेत्री स्वरा भास्करने घेतलं दत्तक!

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे- अजित पवार

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय”

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More