बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अदर पुनावालांकडून गुड न्युज! कोरोनाच्या दुसऱ्या लशीबाबत केली मोठी घोषणा

मुंबई |  भारताता कोरोनाच्या दोन लस उपलब्ध आहेत. यामध्ये कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा समावेश आहे. मात्र तरीही कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी एक गोड बातमी दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट कोरोनाची आणखी एक लस देण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात अदर पुनावाला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्स आणि सीरम कोव्होव्हॅक्स यांच्या भागीदारीने लस भारतात केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरोना व्हायरसमध्ये जे अफ्रिकन आणि यु.के. व्हेरिएंट आढळलं आहे त्यावर ही लस परिणामकारक ठरणार असून  कोरोनाचा सामना करण्यासाठी ही लस 89 टक्के यशस्वी होईल असं दिसत असल्याचं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

या लसीची ट्रायल भारतात चालू झाली असून येत्या सप्टेंबरपर्यंत बाजारात येईल, असा दावाही अदर पूनावाला यांनी केला आहे. तर भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला परवानगी मिळालेली आहे. सीरमने कोविशिल्ड लस ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापाठीसोबत भागीदारीने तयार केलेली. भारतासह परदेशातही अनेक ठिकाणी या लसीची निर्यात झाली. मात्र सध्या कोविशिल्डच्या निर्यातीला केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यट ऑफ इंडिया ही जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सोबत विकसित केलेली कोव्हिशिल्डची लस ही सध्या भारतात दिली जात आहे. अशातच आता दुसरी लसही बाजारात येणार असल्याचं पूनावाला यांनी जाहीर केली आहे. या लसीच्या चाचण्या पुण्यातील रूग्णालयात चालू झाल्याची माहिती आहे.

 

Shree

थोडक्यात बातम्या- 

“ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत”, भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

जीममध्ये जास्तीचं वजन मारताय सावधान! बेंच प्रेस मारताना बॉडी बिल्डरच्या फाटल्या मांसपेशी, पाहा व्हिडीओ

ठाकरे सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट; निलेश राणेंचा गंभीर आरोप

ऑनलाईन बँकिंग करत असाल तर सावधान; बँकेच्या ‘या’ चुकीचा तुम्हाला बसू शकतो मोठा फटका

दिपाली चव्हाण यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारचा झटका, केली ही कारवाई!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More