बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता पेट्रोल पंपावर मिळणार ही सुविधा; इंडियन ऑईलने केली ही मोठी घोषणा

नवी दिल्ली | इंडियन ऑईलने एक मोठी घोषणा केली आहे. ग्राहक इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर सहज पेमेंट करू शकतात. आता ग्राहक एकाच क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही डिजिटल वॉलेट किंवा यूपीआय अॅपमधून पैसे भरू शकतात.

इंडियन ऑईलचे ग्राहक आता गुगल पे, पेटीएम, फोनपे, मोबिक्विक, भीम अॅप किंवा अन्य कोणत्याही यूपीआयद्वारे पैसे देऊ शकतात. पेट्रोल किंवा डिझेल खरेदी केल्यानंतर त्यांना फक्त एकच क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.

डिजिटल पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्डचीही गरज भासणार नाही. इंडियन ऑईल आपल्या सर्व पेट्रोल पंपांवर ही सुविधा देणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ट्विट या संदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे.

हा क्यूआर कोड सर्व प्रकारच्या पेमेंट अ‍ॅप्ससाठी असेल. यासाठी त्यांच्या कोणत्याही पेमेंट अ‍ॅप्समधून त्यांना फक्त क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. अशा प्रकारे ते कोणत्याही अडचणीशिवाय सहज व्यवहार करू शकतात, असं इंडियन ऑईलने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना; मृत मुलाच्या आठवणीत आई चितेच्या राखेतच झोपते

“उपास-तापासाची ही वेळ नाही रोज अंडे, मटन खा, कोरोना झाल्यावर देव वाचवणार नाही”

पुणे हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार

‘कोरोना रुग्णाला दारु दिल्यास तो बरा होता’; नगरच्या डाॅक्टरचा अजब दावा

आरोपीला अटक करुन नेताना नातेवाईकांकडून पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More