देश

गृहनिर्माण क्षेत्रासाठी केंद्राची 25 हजार कोटींची घोषणा

नवी दिल्ली |  गृहनिर्माण क्षेत्रात आलेली मरगळ झटकण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. गृहनिर्माण क्षेत्राला 25 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला आहे.

सरकार एक विशेष निधीची निर्मिती करणार आहे. ज्यामध्ये सरकार १० हजार कोटींचे योगदान देणार आहे. यामध्ये इतरही अनेक संस्थांचा सहभाग असेल त्यामुळे सर्वांचा मिळून हा 25 हजार कोटींचा निधी तयार होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे.

घोषित केलेल्या निधीचा फायदा प्रलंबित असलेल्या अर्धवट गृहप्रकल्पांना होणार असल्याचं मत निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, गृहप्रकल्प एनपीए झालेले आहेत किंवा जे प्रकल्प एनसीएलटी अंतर्गत आहेत, त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. मात्र कंपनीने लिक्विडेशनकडे जाण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा त्यांना लाभ होणार नसल्याचं सीतारामण यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या