कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय.
आज सकाळीच त्यांच्या बावडा येथील निवासस्थानी अनेकांनी भेट घेऊन इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. यावेळी सतेज पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं जाहीर केलंय.
महापालिका निवडणूक काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सर्व एकत्र येऊ, असं सतेज पाटील यांनी नमूद केलं.
कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते.
थोडक्यात बातम्या-
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!
लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!
रामाला मानणारे वचन कसे मोडतात- अण्णा हजारे
“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि त्यांच्या जागेवर…”
फेसबूक पोस्ट करत महिलेचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…