बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर!

मुंबई | आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे. यात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान, 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर 15 जण जखमी अवस्थेत आढळले. बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांपैकी 5 ते 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या

“लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार” 

शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा

इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट, म्हणाली ‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्या’, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More