बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एमपीएससीची मोठी घोषणा! PSI, STI, ASO मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. तसेच एमपीएससीतून पदे मिळवलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्त्या देखील देण्यात आल्या नाहीत. यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झालेले पहायला मिळत होते. त्यातच आता एमपीएससी उमेदवारांना आयोगाने दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 आयोजनाचे दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संयुक्त पेपर क्रमांक 1 ची परिक्षा 22 जानेवारी 2022 रोजी होणार आहे तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पेपर क्रमांक 2 ची परिक्षा 29 जानेवारी 2022, सहाय्यक कक्ष अधिकारी पेपर क्रमांक 2 ची परिक्षा 5 फेब्रुवारी 2022, राज्य कर निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची परिक्षा 12 फेब्रुवारी 2022 या तारखांना होणार आहेत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

एमपीएससीनं काही दिवसांपूर्वीच राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या आता दुय्यम सेवेच्या तारखा जाहीर केल्यानं आयोगानं गतीमान झाल्याची पावती दिली आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आरोग्य भरतीच्या गोंधळामुळं अनेक विद्यार्थ्यांना राज्य सरकार आणि आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल शंका येत होत्या. आरोग्य विभागानं घेतलेली परीक्षा सुद्धा एमपीएससीकडून घेण्यात यावी असं विद्यर्थ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आयोगानं पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मैदानी चाचणीचे निकष सुद्धा बदलले आहेत. आयोग आपल्या साईडवर पुर्व परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिक सविस्तर माहिती प्रकाशित करणार आहे. आयोगाच्या या निर्णायाचं सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा

रणबीर-आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार? शुटिंग थांबवल्याने चर्चांना उधाण

“इतिहास काढला तर लक्षात येईल, हमाम में सब नंगे है”

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More