बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षणासह केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा!

नवी दिल्ली | कोरोनाने देशभरात हैदोस घातला आहे. एकीकडे कोरोना तांडव घालत असताना ऑक्सिजन तुटवडा, रूग्णांना बेड उपलब्ध नाही आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार चालू आहे. ऑक्सिजनअभावी अनेकजणांनी आपला प्राण गमावला. या महामारीमध्ये अनेक कुटुंबच्या कुुटुंब रस्त्यावर आलीत तर कित्येक मुलांनी आपल्या पालकांना गमावलं आहे. अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.

अनाथ झालेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा स्टायपेंड अर्थात निश्चित अशी रक्कम दिली जाईल. त्यासोबतच त्यांनी वयाची 23 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना 10 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल. त्यांच्या भवितव्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरणार आहे.

शिक्षण आणि आर्थिक मदतीसोबतच आयुषमान भारत योजनेअंतर्गत या मुलांचा 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देखील काढला जाणार आहे. 18 वर्षांपर्यंत या मुलांना या विम्याचं संरक्षण राहील. या विम्याचे हफ्ते केंद्र सरकारकडून भरले जाणार आहेत.

दरम्यान, अशा मुलांचा शालेय शिक्षणाचा पूर्ण खर्च हा केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. त्यासोबतच मुलांना उच्चशिक्षणासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करूण देण्यात येणार आहे. कर्जाचं व्याज हे पीएम केअर फंडातून दिलं जाणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

संभाजीराजेंसोबतच्या भेटीत प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य

वर्षभराचा चारा जळून खाक, कृषी पदवीधर युवाशक्तीचा शेतकऱ्याला मदतीचा हात!

लस द्यायला आलं पथक, आज्जीबाईचा चढला पारा, व्हिडीओ जोरदार व्हायरल

बाॅलिवूडवर शोककळा! ‘इंदू की जवानी’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं कोरोनानं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More